आज दिनांक 23 डिसेंबर राष्ट्रीय शेतकरी दिवस, हा "किसान दिवस" म्हणूनही ओळखला जातो, हा दिवस शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमांचा आणि त्यांच्या अमूल्य योगदानांचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. प्रत्येक वर्षी 23 डिसेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो, जे भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीला साजरा होतो. शेतकऱ्यांना समर्पित असलेला हा दिवस त्यांचे महत्त्व आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेतो. शेतकरी दिवसाच्या निमित्ताने लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय, दौलतनगर येथील विद्यार्थ्यांनी शेतात प्रात्यक्षिक आधारीत ऊस लागवडीचे प्रशिक्षण घेतले तसेच खतांबद्दल माहिती घेतली व शेतकऱ्यांसोबत शेतकरी दिन साजरा केला.या राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्याचे मंत्री मा.नामदार शंभूराज देसाईसाहेब , पर्यटन,खाण व माजी सैनिक कल्याण मंत्री यांनी मार्गदर्शन केले तसेच मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई दादा, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई दादा, युवा नेते जयराज देसाई, आदित्यराज देसाई तसेच सचिव श्री एन.एस.कुंभार बाळासाहेब देसाई फाउंडेशन मरळी व प्राचार्य डॉ. एस एम शिंदे सर तसेच सर्व शिक्षकवर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.