आज दिनांक 11 मार्च 2025 रोजी कृषी महाविद्यालयात थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. डॉ. शिंदे एस. एम. यांच्या शुभहस्ते प्रतिमापुजन करण्यात आले.
विद्येविना मति गेली l
मतीविना नीति गेली ll
नीतिविना गति गेली l
गतिविना वित्त गेले ll
वित्तविना शुद्र खचले l
इतके अनर्थ एका अविद्येने केले ll
ही महान शिकवण महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्याला दिली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण समाजासाठी वेचला. म्हणूनच लोकांनी त्यांना महात्मा म्हणून गौरवले. असे विचार प्राचार्य मा. श्री. डॉ. शिंदे एस. एम.यांनी मांडले.
या कार्यक्रमासाठी विद्यालयातील विद्यार्थी -विद्यार्थिनी व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.