कृषी महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी   Date : 14/Apr/2025

Featured Image

कृषी महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

             आज दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी  भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, दलितांचे कैवारी, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती कृषी महाविद्यालयात साजरी करण्यात आली.

           यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तसेच महाविद्यालयातील प्राचार्य मा. डॉ. शिंदे एस. एम. यांनी आपल्या भाषणातून जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत. इतिहास कधी विसरायचा नसतो. त्यातून अनेक गोष्टी शिकायच्या असतात. ज्या चुका इतिहासात झाल्या त्या पुन्हा होऊ द्यायच्या नसतात. त्यावेळीच तुम्ही इतिहास घडवू शकता तसेच शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही सक्षम बनता. तुम्हाला तुमची हक्के, कर्तव्य कळून जातात. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सांगितले.

          या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शेख जी. ए. यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.