लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालयात दिक्षारंभ व विदयार्थी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम साजरा........३० सप्टेंबर २०२५   Date : 03/Oct/2025

Featured Image

 

  आज दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय दौलतनगर येथे दिक्षारंभ व विदयार्थी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून झाली. नवागतांचे स्वागत पुष्प देऊन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. आबासाहेब चव्हाण अध्यक्ष- विद्या प्रबोधिनी करिअर अकॅडमी कराड यांची प्रमुख उपस्थिती होती. यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना वेदना सहन करणारा माणूस यशाची शिखरे गाठतो. त्यामुळे तुम्ही वेदना देणाऱ्या गोष्टी करा जसे कि अभ्यास करणे, पुस्तके वाचणे, व्यायाम करणे, इ. स्पर्धा परीक्षांचे नियोजन करण्यासाठी, प्रथम परीक्षा आणि अभ्यासक्रम समजून घ्या, तुमची ताकद आणि कमकुवतपणा ओळखा, योग्य पुस्तके निवडा, यशस्वी झालेल्या व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या आणि अभ्यास करताना तार्किक विचार करा.  संगणक आणि मोबाइलचा वापर आवश्यकतेनुसार करा, असे सांगितले.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिंदे एस. एम. यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनाला वेगळे आणि महत्त्वाचे वळण मिळत असल्याने शिक्षण आणि करिअर घडविण्यासाठी विविध क्षेत्रांची माहिती देण्यासाठी करिअर मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त आहे असे सांगितले. 

 मा. नामदार श्री. शंभूराजे देसाईसाहेब महाराष्ट्र राज्य पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री तसेच मा. श्री. रविराज देसाई दादा अध्यक्ष-  मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी तसेच मा. श्री. यशराज देसाई दादा चेअरमन- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि. दौलतनगर तसेच युवानेते मा. जयराज देसाई दादा तसेच मा. आदित्यराज देसाई दादा यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रा. शेख जी. ए. यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास विदयार्थी- विद्यार्थिनी, प्राचार्य, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.