दौलतनगर परिसरात नूतन कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे काम सुरू असून दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी मा. रविराज देसाई दादा अध्यक्ष- मोरणा शिक्षक प्रसारक मंडळ मरळी यांनी पाहणी केली.
सध्या कामाची समाधानकारक परिस्थिती असून सातारा जिल्ह्यातील आधुनिक कृषी महाविद्यालय म्हणून या महाविद्यालयाचा गौरव व्हावा ही इच्छा व्यक्त केली. यावेळी युवानेते मा. जयराज देसाई दादा यांनी या महाविद्यालयात आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर पाटण तालुक्यातील ग्रामीण पिकांचा अभ्यास व्हावा असे सुचित केले. मा. नामदार श्री. शंभूराजे देसाईसाहेब महाराष्ट्र राज्य पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री यांच्या प्रयत्नातून कृषी महाविद्यालयास निधी मंजूर करून दिला. यावेळी मा. यशराज देसाई दादा चेअरमन- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि. दौलतनगर यांनी विद्यार्थ्यांनी सुविधांचा वापर करावा असे आवाहन केले.