
दिनांक 23.01.2026 पाटण(दौलतनगर) -:-आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना अंतर्गत ‘अर्बन फॉरेस्ट डेव्हलपर’ या अभ्यासक्रमाची अंतिम परीक्षा लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय, दौलतनगर या महाविद्यालयामध्ये यशस्वीरीत्या संपन्न झाली. या परीक्षेसाठी वरिष्ठ पर्यवेक्षक महेश निकम (अहिल्यानगर) यांनी कामकाज पाहिले.
या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार श्री. शंभूराज देसाई साहेब यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उद्योग समूहाचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी या कौशल्य विकास उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
तसेच मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रविराज देसाई दादा यांनी आजच्या युवकांनी कौशल्याधारित शिक्षणाकडे वळून पर्यावरण संवर्धन व रोजगारनिर्मितीच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि., दौलतनगरचे चेअरमन मा. श्री. यशराज देसाई दादा, युवा नेते मा. ॲड. जयराज देसाई दादा तसेच मा. चि. आदित्यराज देसाई दादा यांनीही विद्यार्थ्यांना व आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
या परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. शिंदे सर व नेतृत्वाखाली संपन्न झाली, यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद,व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.