लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय दौलतनगर येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन श्री. नरेंद्र मोदी साहेब मा. पंतप्रधान यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमावेळी मा. रविराज देसाई (दादा) अध्यक्ष- मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी यांनी पाटण तालुक्यातील युवकांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच मा. यशराज देसाई (दादा) चेअरमन - लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि. दौलतनगर यांनी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र हे पाटण तालुक्यातील एकमेव केंद्र असून त्याचा लाभ सामान्य कुटुंबातील युवकांना व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी संस्थेचे आधारस्तंभ व मार्गदर्शक मा. शंभूराज देसाई साहेब राज्य उत्पादन शुल्क मंत्री महाराष्ट्र तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री यांनी या केंद्राच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मा. प्रकाश पाटील काका, प्रा.नथुराम कुंभार सचिव - बाळासाहेब देसाई फौंडेशन दौलतनगर, डॉ. सचिन शिंदे प्राचार्य- लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय दौलतनगर तसेच सर्व महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.