शिवाजंली इंग्लिश मिडीयम स्कूल नाडे - नवारस्ता या विदयालयाची कृषी महाविद्यालयास सदिच्छा भेट    Date : 05/Apr/2025

Featured Image

आज दिनांक 13 मार्च 2025 रोजी शिवांजली इंग्लिश मीडियम स्कूल,नाडे- नवारस्ता  येथील शाळेची लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालयास क्षेत्रभेट देण्यात आली. या भेटी दरम्यान कृषी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. शिंदे एस. एम. यांनी महाविद्यालयातील विविध विभागांची माहिती सांगितली. कृषी क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या विविध उपकरणांची माहिती सांगितली. प्रा. नेवसे एस.व्ही. यांनी मृदा शास्त्रामध्ये माती परीक्षण कसे करता येते तसेच खडकांपासून माती कशी तयार होते, खतांची माहिती , मातीचे सॅम्पल घेताना कोणती साधने वापरली जातात याची माहिती दिली. माती परीक्षण घेण्यासाठी प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन मुलांना प्रॅक्टिकल करून दाखवले.  प्रा. शेख जी. ए .यांनी कीटकशास्त्राबद्दल माहिती सांगितली. तसेच काही कीटक हे मित्र कीटक असतात तर काही शत्रू कीटक म्हणजेच पिकांवर येणाऱ्या किडी यांची माहिती सांगितली.प्रा. राऊत एस.एस. यांनी पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभाग यांची माहिती सांगितली. दुग्ध व्यवसायामध्ये कशी प्रगती करता येईल याची माहिती दिली. यावेळी महाविद्यालयात शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.