लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन   Date : 05/Apr/2025

Featured Image

लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय  दौलतनगर महाविद्यालयामध्ये* 

 लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन

आज दिनांक 7 मार्च 2025 रोजी सकाळी ठीक  दहा ते बारा या वेळेमध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय दौलतनगर या आपल्या महाविद्यालयांमध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांच्या115 व्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .

त्यामध्ये प्रामुख्याने निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा या स्पर्धांना प्राधान्य देण्यात आले .

 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नोटीस मार्फत या स्पर्धेची कल्पना आधीच दिली होती. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग  दर्शविला . निबंध स्पर्धा या स्पर्धेमध्ये जवळपास 21 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. कु.अस्मिता हिने आपल्या  निबंधातून जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा असा लोकनेता पुन्हा होणे नाही  असे विचार मांडले.स्पर्धा पार पडल्यानंतर त्यांनी दिलेले निबंध एकत्रित करण्यात आले. मा.प्राचार्य  यांच्या परवानगीने वक्तृत्व स्पर्धा सुरू करण्यात आली.रोहन जगदाळे याने लोकनेत्यांच्या  दूरदृष्टीची संकल्पना  गावाचा विकास केला तरच देशाचा विकास होईल अशी  मांडली.यादरम्यान स्पर्धकांनी लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले. स्पर्धेचे परीक्षक  वत्सलादेवी देसाई इंग्लिश मीडियम स्कूल, दौलतनगर येथील शिक्षिका चोपदार मॅडम व जाधव मॅडम  यांच्यामार्फत करण्यात आले .

अशा प्रकारे महाविद्यालयांमध्ये स्पर्धा सुरळीतपणे पार पडल्या.

 स्पर्धेचे मानकरी खालील प्रमाणे.

निबंध स्पर्धा .

प्रथम क्रमांक : अस्मिता पांडुरंग सूर्यवंशी

द्वितीय क्रमांक: स्वरांजली राजेंद्रसिंह आयरेकर 

तृतीय क्रमांक: अदिती अनिल वलेकर

वक्तृत्व स्पर्धा .

१) प्रथम क्रमांक: रोहन काशिनाथ जगदाळे

२) द्वितीय क्रमांक: प्रांजली रमेश चव्हाण

३) तृतीय क्रमांक: रोहित गजानन पडयाल 

           स्पर्धेमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे महाविद्यालयामार्फत अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा. शेख  यांनी केले.  कार्यक्रमास कृषी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.