आज दिनांक 10 मार्च 2025 रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय दौलतनगर येथे महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, राज्याचे माजी गृहमंत्री ,पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांची 115 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.शिंदे एस.एम. यांनी लोकनेते साहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.